Use of Atom
होता कुणि दृष्टा कणाद ज्याचे नांव , विचारांची त्याच्या झेंप घ्यावी ज्ञानाने धाव ,
ज्ञानी आमुचे तोकडे केला न विचार , ना केला अभ्यास राहिले अज्ञानात रत ।
आधुनिक विज्ञानाचा प्रसार झाला , मिळाला अणु परमाणू ,
वापर झाला त्याचा मात्र, विनाशाला आमन्त्रून ।
दिपले जग त्या तेजाने , अन जाहला हाहाकार ,
झाला थरकांप जीवांचा , पाहुनी तो रूद्रावतार ।
केला विचार ज्ञानियांनी , हा तर सहावा अवतार ,
घालू वेसण ह्या भूताला , होऊ ह्याच्या वरती स्वार ।
शस्त्र असते दुधारी , केव्हांतरी उलटून मारी ,
वापरण्या ते हितासाठी , वापरावी बुद्धी भारी ।
सूज्ञ पणाने केला वापर , मिळेल उर्जा अपरंपार ,
झाला जर गैरवापर , जगी होईल हाहाकार ।

No comments:
Post a Comment