Monday, April 28, 2014

Use of Atom


Use of Atom

होता कुणि दृष्टा कणाद ज्याचे नांव , विचारांची त्याच्या झेंप घ्यावी ज्ञानाने धाव ,
ज्ञानी आमुचे तोकडे केला न विचार , ना केला अभ्यास राहिले अज्ञानात रत ।

आधुनिक विज्ञानाचा प्रसार झाला ,  मिळाला अणु परमाणू ,
वापर झाला त्याचा मात्र,  विनाशाला आमन्त्रून ।

दिपले जग त्या तेजाने , अन जाहला हाहाकार ,
झाला थरकांप जीवांचा ,  पाहुनी तो रूद्रावतार ।

केला विचार ज्ञानियांनी ,  हा तर सहावा अवतार ,
घालू वेसण ह्या भूताला ,  होऊ ह्याच्या वरती स्वार ।

शस्त्र असते दुधारी ,  केव्हांतरी उलटून मारी ,
वापरण्या ते हितासाठी ,  वापरावी बुद्धी भारी ।

सूज्ञ पणाने केला वापर , मिळेल उर्जा अपरंपार ,
झाला जर गैरवापर ,  जगी होईल हाहाकार ।